मुंबई : बॉलिवूडचा गायक सोनू निगमने एक ट्विट केलं आहे ज्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या आहेत. सोमवारी सकाळी मस्जिदवरील भोंग्याबाबत त्यांने एक ट्विट केलं. रोज सकाळी मोठ्या आवाजात मस्जिदमध्ये अझान दिली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आवाजानंतर साहजिकच अनेकांची झोप उडत असेल. यावरच सोनू निगमने ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. त्याने म्हटलं आहे की, मी मुस्ल‍ीम नाही आहे पण मस्जिदची अझान ऐकून रोज मला उठावं लागतं. कधी ही धार्मिक जबरदस्ती थांबणार आहे?' त्यानंतर त्याने आणखी एक ट्विट करताना म्हटलं की 'मला वाटत नाही की कुठल्या देवळात, गुरुद्वारामध्ये वीजेचा वापर करून त्या धर्माचं पालन न करणाऱ्या लोकांना जबरदस्ती झोपेतून उठवलं जातं. ही तर गुंडागर्दी आहे'


सोनू निगमच्या या ट्विटनंतर शाब्दीक युद्ध सुरू झालं आहे. काही मुस्लीम लोकांची त्याच्या विधानाचं स्वागत केलंय तर काहींनी त्याच्यावर टीका केली आहे.