मुंबई : सलमान खानचा सुल्तान सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत यश मिळवतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या पाच दिवसांत बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडल्यानंतर हा सिनेमा सहाव्या दिवशी सुल्तान २०० कोटींचा आकडा पार करेल असे वाटले होते. मात्र या सिनेमाला सहाव्या दिवसापर्यंत १९५.९० कोटींपर्यंत कमाई करता आलीये.


ईदच्या मुहूर्तावर सलमानचा सुल्तान प्रदर्शित झाला. चित्रपटाची कहाणी, सलमान-अनुष्काचा दमदार अभिनय, चांगले संवाद यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय.