मुंबई : प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान लवकरच अॅक्टिंग क्षेत्रात पदार्पण करतेय. 'प्लेईंग प्रिया' या शॉर्टफिल्ममध्ये ती अभिनय करणार आहे. सुनिधीने म्युझिक क्षेत्रात चांगले नाव कमावले असले तरी तिच्या पर्सनल लाईफबद्दल फार कमी लोक जाणत असतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनिधीचे पहिले लग्न १८व्या वर्षातच कोरिओग्राफर बॉबी खानशी झाले होते. मात्र वर्षभरातच त्यांचे लग्न मोडले. सुनिधीने एका मुलाखतीत सांगितले होते की बॉबीसोबत ती खुश होती.


घरच्यांच्याविरोधात जाऊन सुनिधीने हे लग्न केले होते. २००२मध्ये त्यांचे लग्न झाले मात्र २००३मध्ये त्यांचे लग्न मोडले. त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी म्हणजेच २०१२मध्ये सुनिधीने दुसरे लग्न म्युझिक डायरेक्टर हितेश सैनिकशी केले. 


सुनिधीने गाण्याची सुरुवात वयाच्या १३व्या वर्षी केली. २० वर्षांच्या गायनाच्या करियरमध्ये तिने अनेक बॉलीवूड चित्रपटाची गाणी गायलीत.