मुंबई : पॉर्नस्टार सनी लिओनी लवकरच बॉलीवूडमध्ये अलोकनाथ यांच्याबरोबर काम करणार आहे. अलोकनाथ यांची ओळख संस्कारी बाबूजी अशी आहे. यांच्यासोबत विनोदी कलाकार दीपक डोबरिया देखील जाहीरातीत दिसेल.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनी लिओनी आणि अलोकनाथ एका तंबाखूविरोधी मोहिमेअंतर्गत जाहिरातीत काम करणार आहेत. धुम्रपानामुळे होणारे तोटे आणि ते टाळण्यासाठीचा सामाजिक संदेश सनी आणि आलोकनाथ जाहिरातीतून देणार आहेत. 


सनी लिओनी जाहिरातीत हरियाणातील एका मुलीची भूमिका साकारणार आहे. दीपक डोबरिया धुम्रपानामुळे मरणासन्न अवस्थेत आलेल्या तरुणाच्या भूमिकेत दिसेल. आलोकनाथ जाहिरातीचे सूत्रसंचलन करताना दिसून येतील.