मुंबई : सनी लिओनची चांगलीच चलती आहे. सनी मीडियाशी बोलताना कधी फसली नाही, उलट सनीची फिरकी घेणारेच अडचणीत येतात, सनी भारतीय मीडियासमोर बोलताना कधी अडखळतही नाही. मात्र सनीला असा काही प्रश्न विचारला गेला की थेट सनीच्या नवऱ्यानेच हस्तक्षेप करत वेळ मारून नेली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र नुकत्याच झालेल्या एका 'कंडोम'च्या जाहिरातीबद्दल सनीला माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला जाणार इतक्यातच सनीचा पती आणि मॅनेजर डॅनिअल वेबर याने तिला या प्रश्नाचे उत्तर देण्यापासून अडवले. 


सनी लिओनीचा सहभाग असणाऱ्या 'मॅनफोर्स कंडोम्स'च्या जाहिरातीला आक्षेपार्ह ठरवत, ती अश्लिल असल्यामुळे अशा जाहिरातींमुळेच बलात्कारांचे प्रमाण वाढते असा आरोप, अतुल अंजान या राजकारण्याने केल्याप्रकरणाबद्दल सनीला तिची प्रतिक्रिया विचारली होती.


याविषयी सनी उत्तर देणार इतक्यातच तिथे उपस्थित असणाऱ्या डॅनिअलने 'मुख्य मुद्याला अनुसरुन प्रश्न नसल्याचे' कारण देत तिला उत्तर देण्यापासून अडवले.