सनी लिओनीला आवडतो हा क्रिकेटपटू
बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीनं तिचा आवडता क्रिकेटपटू कोण याबाबत खुलासा केला आहे.
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीनं तिचा आवडता क्रिकेटपटू कोण याबाबत खुलासा केला आहे. चाहत्यांशी सोशल नेटवर्किंगवरून सनी संवाद साधत होती. यावेळी तिला तुझी आवडती टीम आणि आवडता क्रिकेटपटू कोण हा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी सनीनं तिला भारतीय क्रिकेट टीम आणि महेंद्रसिंग धोनी आवडतो अशी प्रतिक्रिया दिली.
आयपीएलचा दहावा सिझन सध्या सुरू आहे. या सिझनमध्ये धोनीनं सुरुवातीला फारशी चमकदार कामगिरी केली नाही पण हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये ३४ बॉल्समध्ये ६१ रन्सची खेळी केली. धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतानं टी20 वर्ल्ड कप, २०११चा वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय मिळवला.