मुंबई : बॉलिवूडची 'बेबी डॉल'नं तिला डोळ्यासमोर ठेऊन सिनेमा बनवणाऱ्या सिनेनिर्मात्यांना चांगलाच धक्का दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनीनं आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एक असा मुद्दा टाकलाय ज्यामुळे सिनेनिर्मात्यांची चांगलीच निराशा होणार आहे. सनीनं आपण यापुढे 'किसिंग सीन' करणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलंय. 


स्क्रिनवर आपण कुणालाही किस करणार नाही, असं सनीनं म्हटलंय. सनीच्या नव्या कॉन्ट्रॅक्टनुसार, आता ती केवळ असेच सिनेमे करणार आहे ज्यामध्ये किसिंग सीन नाहीत. 


सनीचा निर्णय आणि त्याचे परिणाम


उल्लेखनीय म्हणजे, सनीनं आत्तापर्यंत जेवढे सिनेमे केलेत त्यात किसिंग आणि बोल्ड सीन्सची कोणतीही कमतरता सोडली गेलेली नाही. नुकताच सनीचा 'वन नाईट स्टँड' प्रदर्शित झालाय... बॉक्स ऑफिसवर मात्र हा सिनेमा साफ आदळलाय... 


याआधी आलेल्या लीला, कुछ कुछ लोचा है, मस्तीजादे या सिनेमांतही सनीचे किसिंग सीन दिसलेले नाहीत.