मुंबई : 'बिग बॉस' आणि 'स्प्लिट्झव्हिला' या रिअॅलिटी शो मध्ये भाग घेणारी सनी लिओनी म्हणते, 'अनेक प्रेक्षकांना वाटते की टीव्हीवरील रिअॅलिटी शो हे आधीपासून ठरविल्याप्रमाणे चालविले जातात, परंतु ते सत्य नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उलट काही प्रसंग ज्यांच्यामुळे मीडियात हेडलाइन्स होतात. ते आमच्यासाठी सुद्धा अचानक समोर येणारं आणि धक्का देणारं असतं.'


एमटीव्हीच्या 'स्प्लिट्झव्हिला' या रिअॅलिटी शोच्या नवव्या आवृत्तीची होस्ट म्हणून सनी ११ जुलै पासून आपल्याला पुन्हा दिसणार आहे. 


यात 'स्त्रियांची हुकूमत' ही थीम असलेल्या या कार्यक्रमात ६ तरुणी राजकन्यांच्या भूमिकेत तर त्यांची हृदये जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या योद्ध्यांच्या भूमिकेत ९ तरुण असणार आहेत.