म्हणून सुशांतनं हटवलं `राजपूत` आडनाव
दिग्दर्शक संजय लीला भन्साळींवर राजस्थानमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बॉलीवूड एकवटलं आहे.
मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळींवर राजस्थानमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बॉलीवूड एकवटलं आहे. जवळपास सगळ्याच बॉलीवूड सेलिब्रिटींनी या हल्ल्याचा निषेध केला असताना अभिनेता सुशांतसिंग राजपूत यानं धाडसी पाऊल उचललं आहे. सुशांतनं हल्ल्याचा निषेध म्हणून त्यांच राजपूत हे आडनाव हटवलं आहे.
जोपर्यंत आडनाव असेल तोपर्यंत आपल्याला हे सहन करावं लागेल. माणुसकीपेक्षा कोणताही धर्म किंवा जात मोठी नाही. प्रेमच आम्हाला माणूस बनवतं. विभाजन आणि तेढ आणि स्वत:च्या फायद्यासाठी निर्माण केली जाते असं ट्विट सुशांतनं केलं आहे.
मेहरानगड किल्ल्यात शूटिंग सुरू असताना राजपूत कर्नी सेनेकडून 'पद्मावती' सिनेमाचा निषेध करत सामानाची तोडफोड केली. 'पद्मावती' सिनेमात इतिहासाशी छेडछाड करण्यात येत असल्याचं कर्नी सेनेचं म्हणणं होतं. यावेळी किल्ल्याच्या परिसरात असलेले अनेक साहित्याची तोडफोड केली गेली, तसंच संजय लीला भन्साळींवरही हल्ला करण्यात आला.