सुझानसोबत पुन्हा संसार थाटण्यावर हृतिक म्हणतो...
हृतिक रोशन म्हणतोय, सध्या तरी मी एकटाच बरा आहे. सुझान खानशी घटस्फोट झाल्यानंतर ह्रतिक सध्या एकटाच रहातोय. त्यामुळे सुझान आणि ह्रतिकमधील या दुराव्याची चर्चा इंडस्ट्रीत अधूनमधून होत असते. ह्रतिक पुन्हा लग्न करणार का अशीही बातमी अधूनमधून चर्चेला येत असते...मात्र ह्रतिकला या सगळ्याबाबत काय वाटतं पाहूया..
मुंबई : हृतिक रोशन म्हणतोय, सध्या तरी मी एकटाच बरा आहे. सुझान खानशी घटस्फोट झाल्यानंतर ह्रतिक सध्या एकटाच रहातोय. त्यामुळे सुझान आणि ह्रतिकमधील या दुराव्याची चर्चा इंडस्ट्रीत अधूनमधून होत असते. ह्रतिक पुन्हा लग्न करणार का अशीही बातमी अधूनमधून चर्चेला येत असते...मात्र ह्रतिकला या सगळ्याबाबत काय वाटतं पाहूया..
बॉलिवूडचा सुपरहिरो हृतिक रोशनला एक्स वाईफ सुझान खान बरोबर घटस्फोट झाल्यानंतर पुन्हा लग्न करण्याची इच्छा नाहीय. सध्या मी पुन्हा लग्न करण्याच्या अजिबात विचार करत नाहीय. माझ्या आयुष्यात मी आनंदी आहे, असं हृतिकने म्हंटलय.
2014 मध्ये हृतिक आणि सुझानचा घटस्फोट झाला होता..मात्र तरीही सुझान आणि हृतिक ब-याचदा एकत्र दिसले. न्यू ईयर आणि हृतिकच्या बर्थडे पार्टीत सुझानचं हृतिकच्या फॅमिलीबरोबर जे बॉन्डिंग दिसले त्यामुळे दोघांमध्ये पुन्हा सगळं ठीक होईल असचं वाटतं होतं. पण हृतिक आणि सुझानला आता पुन्हा घाई करुन कोणताच निर्णय घेण्याची इच्छा नाहीय. हृतिकला पण आता त्याचं पूर्ण लक्ष त्याच्या करियरवर केंद्रित करायचं आहे.
लवकरचं हृतिकचा काबील प्रदर्शित होणार असून हा सिनेमा हीट करण्यासाठी हृतिकने कंबर कसली आहे. त्यामुळे सध्या तरी हृतिकने सिंगल राहण्याचाच निर्णय घेतलाय.