VIDEO TRAILER : अमिताभ, विद्या, नवाझुद्दीन... दमदार `TE3N`
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा `TE3N` या सिनेमाचा व्हिडिओ ट्रेलर प्रदर्शित झालाय....
मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा 'TE3N' या सिनेमाचा व्हिडिओ ट्रेलर प्रदर्शित झालाय....
पहिल्याच दमात हा सिनेमा प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी ठरलाय... त्याचं कारण म्हणजे या सिनेमाची तगडी स्टारकास्ट...
बीग बी अमिताभ बच्चन, विद्या बालन आणि नवाझुद्दीन सिद्दीकी या तिघांच्या दमदार भूमिका या सिनेमात दिसत आहेत.
आपल्या नातीला शोधणाऱ्या आजोबांच्या भूमिकेत अमिताभ बच्चन दिसत आहेत तर विद्या एका पोलिसाच्या भूमिकेत दिसतेय. नवाझुद्दीन या सिनेमात चर्चमधल्या फादरच्या भूमिकेत दिसतोय. हा सिनेमा १० जून रोजी प्रदर्शित होणार आहे.