चित्रीकरणानंतर `टायगर जिंदा है`ची टीम परतली भारतात
सलमान खान सध्या `टायगर जिंदा है` या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये व्यस्त आहे. २०१७च्या सर्वात मोठ्या चित्रपटांमध्ये या चित्रपटाची गणना होते.
मुंबई : सलमान खान सध्या 'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये व्यस्त आहे. २०१७च्या सर्वात मोठ्या चित्रपटांमध्ये या चित्रपटाची गणना होते.
या चित्रीकरणाचं फर्स्ट शेड्युल्ड ऑस्ट्रीयात आटपलं. चित्रीकरण संपवून टीम आता भारतात परतली आहे.
त्याआधी कतरिना कैफ भारतात परतली. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी काम संपल्यानंतरचा सलमानसोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केला.
चित्रपटातील काही गाणी आणि काही अॅक्शन सीन्स तिकडे शुट केले गेले. काही जास्तीच्या शुटसाठी सलमान तिकडे जास्त वेळ थांबला होता. चित्रीकरणादरम्यान म्हणे तिथलं तापमान शुन्य अंशाखाली होतं.