मुंबई : 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' नावाचा एक नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला आणि सामाजिक परस्थितीमुळे त्यांच्या दबलेल्या इच्छा... आणि आपल्या अशाच काही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांची अंधारातली धडपड अशा काहीशा पार्श्वभूमीवर बेतलेला हा सिनेमा दिसतोय. भोपाळमध्ये हा सिनेमा चित्रीत करण्यात आलाय.  


रत्ना पाठक-शाह, कोंकणा सेन-शर्मा, आहना कुम्रा आणि प्लबिता बोर्थाकूर यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. तसंच विक्रांत मेस्सी आणि सुशांत सिंग हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. अलंक्रिता श्रीवास्तव यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.