मुंबई : ऱांगड्या जीवांची भाबडी प्रेमकथा तुझ्यात जीव रंगला सध्या झी मराठीवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका आहे. या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणादाच्या भूमिकेतील हार्दिक जोशी आणि पाठकबाईंच्या भूमिकेतील अक्षया देवधर यांची जोडी तर सध्या हिट ठरलीये. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील कलाकारांचा एक सेल्फी नुकताच झी मराठीच्या फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आलाय.


या मालिकेचे २०० भाग पूर्ण होतायत. त्या निमित्त मालिकेतील कलाकारांनी एक सेल्फी काढलाय. हा सेल्फी शेअर करण्यात आलाय.