मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी कुमार आणि सुपरहिरो हृतिक रोशन यांचे बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी सिनेमे प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारच्या ‘रूस्तम’कडे त्याच्या चाहत्यांप्रमाणेच बॉलिवूडकरांचंही लक्ष लागून राहिलं आहे. पण 12 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाला मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावं लागणार आहे. कारण अभिनेता हृतिक रोशनचा ‘मोहेंजोदरो’ हा सिनेमाही याच दिवशी प्रदर्शित होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन मोठ्या अभिनेत्याच्या या सिनेमावरुन आता कोल्डवॉर सुरु होतांना दिसत आहे. अक्षय आणि हृतिक यांच्यात देखील ट्विटरवर कोल्डवॉर रंगलं आहे. रुस्तम सिनेमाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी सपोर्ट दर्शवला आहे. हृतिक रोशनला सगळ्यांनी एकटं सोडल्याचं दिसतंय. पण हृतिक रोशनने जे केलं त्यासाठी त्याचं कौतूक केलं पाहिजे. कारण त्याने त्याच्या मोहनजोदडो सिनेमासह अक्षयच्या रुस्तमचं ही प्रमोशन केलं.


हृतिकच्या या ट्विटवर अक्षय कुमारने देखील कमालीचं उत्तर दिलं. अक्षय कुमारने म्हटलं की, 'बस कर पगले अब रुलाएगा क्या ?'