मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता विनोद खन्ना यांचे ७०व्या वर्षी मुंबईत निधन झालेय. बॉलीवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या विनोद खन्ना यांच्याबद्दल या २० गोष्टी कदाचित तुम्हाला माहीत नसतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. विनोद खन्ना यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ मध्ये पाकिस्तानच्या पेशावरमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचा टेक्सटाईल्स, डाय आणि केमिकलचा बिझनेस होता. 


२. विनोद खन्ना यांना एक भाऊ आणि तीन बहिणी आहेत. स्वातंत्र्यानंतर झालेल्या फाळणीत त्यांचे कुटुंब पाकिस्तानातून मुंबईत आले. 



३. विनोद लहानपणी फारच लाजाळू होते. शाळेत असताना त्यांना शिक्षिकेने जबरदस्तीने नाटकात भाग घ्यायला लावला. त्यावेळी विनोद यांचा अभिनय शिक्षिकेला खूप आवडला. 


४. बोर्डिंगमध्ये शिकत असताना विनोद खन्ना यांनी सोलवा साल आणि मुगल ए-आज़म यासारखे सिनेमे पाहिले. हे सिनेमे त्यांच्या जीवनावर परिणाम करणारे ठरले. 


५. आपल्या मुलाने सिनेमात जाऊ नये अशी विनोद यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र विनोद यांच्या हट्टापुढे त्यांच्या वडिलांना झुकावे लागले. त्यांनी विनोद यांना सिनेसृष्टीत स्थिरावण्यासाठी दोन वर्षांची मुदत दिली. यादरम्यान त्यांनी जीवतोड मेहनत घेतली आणि सिनेसृष्टीत स्थान मिळवले. 


६. हँडसम विनोद यांना सुनील दत्त यांच्या 'मन की मीत' या सिनेमात खलनायकाच्या रुपात विनोद खन्ना पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आले. त्यानंतर त्यांची सिनेकारकीर्द बहरायला सुरुवात झाली. 


७. हिरो म्हणून नाव मिळवण्यापूर्वी विनोद यांनी आन मिलो सजना, पूरब और पश्चिम, सच्चा झूठा यासारख्या सिनेमांमध्ये सहाय्यक अथवा खलनायकाची भूमिका साकारली. गुलजार दिग्दर्शित मेरे अपने या सिनेमातून ते हिरो म्हणून प्रसिद्धीस आले. 


८. अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांच्या पडद्यावरील जोडीला प्रेक्षकांनी मोठी पसंती दर्शवली होती. हेराफेरी, खून पसीना, अमर अकबर अँथनी, मुक्कदर का सिकंदर या सिनेमात ही जोडी ब्लॉकबस्टर ठरली. 


९. यशाच्या शिखरावर असताना अचानक १९८२मध्ये विनोद खन्ना यांनी सिनेसृष्टीतून तात्पुरते बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय़ सिनेसृष्टीसाठी धक्कादायकत होतो. या काळात ते आध्यात्मिक गुरु रजनीश ओशो यांच्या आश्रमात गेले. येथे त्यांनी माळीचे कामही केले. 


१०. विनोद यांच्या अशा अचानक निघून जाण्याने त्यांचे कुटुंबच पूर्णपणे विखुरले. त्यांची पहिली पत्नी गीतांजली यांनी विनोद यांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. विनोद आणि गीतांजली यांना दोन मुले आहेत. अक्षय आणि राहुल खन्ना ही त्यांची मुले. 


११. १९९०मध्ये विनोद यांनी कविता यांच्याशी लग्न केले. कविता आणि विनोद यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 


१२. सिनेसृष्टीपासून काही काळ दूर राहिल्यानंतर १९८७मध्ये त्यांनी इन्साफमधून पुनरागमन केले. त्यानंतर पुढील चार ते पाच वर्षे त्यांनी सिनेमांमध्ये हिरोच्या भूमिका साकारल्या. 


१३. विनोद खन्ना यांनी सलमानसोबतही अनेक सिनेमांमध्ये काम केले. सलमान विनोद यांना स्वत:साठी लकी समजायचा.


१४. विनोद खन्ना यांनी बॉलीवूडमध्ये स्टायलिश अभिनेता असा ट्रेंड सेट केला होता. 


१५. विनोद खन्ना अभिनेता असण्यासोतच निर्माता तसेच राजकारणातही सक्रिय होते. वाजपेयींच्या काळात त्यांनी मंत्रीपदही भूषवले होते.


१६. १९९९मध्ये विनोद खन्ना यांना बॉलीवूडमधील त्यांच्या योगदानाबद्दल फिल्मफेअर लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवॉर्ड देण्यात आला होता.