अहमदाबाद : शाहरुख खान स्टारर रशीस या सिनेमाच्या शूटिंगला गुजरातमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्यकर्त्यांनी सिनेमाच्या ऑन लोकेशनवर जाऊन सिनेमाचं शूट बंद पाडलं. शाहरुख खान देशद्रोही असल्यामुळे काहीही झालं तरी सिनेमाचं शूट गुजरातमध्ये होऊ देणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा असहिष्णुतेवर केलेल्या वक्तव्याचा परिणाम शाहरुखच्या सिनेमावर होणार असं दिसतयं.


सिनेमात शाहरुखबरोबर नजाझुद्दीन सिद्दीकी आणि माहिरा खान यांच्या प्रमुख भूमिका असून राहूल ढोलकियाने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.


शाहरुखच्या दिलवालेलाही अशाच प्रकारचा विरोध झाल्यामुळे सिनेमाला बॉक्स ऑफिसवर खूप मोठा तोटा सहन करावा लागला होता.