VIDEO : `चला हवा...`साठी अजयला काजोलची मराठी शिकवणी!
आपला आगामी सिनेमा `शिवाय` बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरण्यासाठी अभिनेता अजय देवगन वेगवेगळे फंडे वापरतोय... याचाच एक भाग म्हणून तो आता `झी मराठी`वरच्या बहुचर्चित अशा `चला हवा येऊ द्या` या कार्यक्रमात आपला चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसणार आहे.
मुंबई : आपला आगामी सिनेमा 'शिवाय' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरण्यासाठी अभिनेता अजय देवगन वेगवेगळे फंडे वापरतोय... याचाच एक भाग म्हणून तो आता 'झी मराठी'वरच्या बहुचर्चित अशा 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात आपला चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसणार आहे.
यासाठी त्याला मराठी शिक्षिकाही त्याच्या घरातच मिळालीय. अजयची पत्नी आणि अभिनेत्री काजोल हिला मराठी चांगलंच जमतं, हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर जाणार म्हटल्यावर काजोलनं अजयची मराठी शिकवणी सुरु केलीय. याचीच एक झलक आपल्याला फेसबुकवर पाहायला मिळतेय.
मराठी कार्यक्रमांत सहभागी होण्याची अजयची ही काही पहिलीच वेळ नाही याआधीही अजयनं आपल्या 'सिंघम' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'सा रे ग म'च्या सेटवर हजेरी लावली होती.
याअगोदर सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, विद्या बालन, जॉन अब्राहम, वरूण धवन, सोनम कपूर या बॉलिवूड कलाकारांनीदेखील 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर हजेरी लावलीय.