मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट हिनं नुकताच आपला २३ वा वाढदिवस साजरा केला... पण, आपल्या वाढदिवसाच्याच दिवशी आलिया ढसाढसा रडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होय, आलियाच्या आयुष्यातला हा एक भावूक क्षण होता. १५ मार्च रोजी आलियाचा वाढदिवस होता. मात्र, मंगळवारी आलियाच्या आजी-आजोबांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा जरा हटके पद्धतीनं दिल्या... आणि आलियाला आपले अश्रू आवरणं कठिण झालं. 



आलियाची आई सोनी राझदान हिची आई ट्रुडी राझदान आणि वडील एन राझदान यांनी आलियाचा वाढदिवस हटके पद्धतीनं सेलिब्रेट केला... हा क्षण आलियाची बहिण पूजा भट्ट हिनं आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.