मुंबई : तुम्ही आजवर बॉलिवूडमधले अनेक लव्ह ट्रॅंगल पाहिले असतील... पण, 'हरामखोर'च्या माध्यमातून समोर येणारा लव्ह ट्रॅंगल मात्र यातून नक्कीच वेगळा असेल... नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रसिद्ध झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवाझुद्दीन सिद्दीकी आणि श्वेता त्रिपाठी हे दोघे या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसत आहेत. नवाझुद्दीन हा एक विवाहीत शिक्षक आहे. आपल्याच एका विद्यार्थिनीच्या प्रेमात तो पडलाय... यातही तो या विद्यार्थिनीला पटवण्यसाठी आपल्या आणखी एका विद्यार्थ्याशी स्पर्धा करताना दिसतोय. मध्यप्रदेशच्या सामाजिक वातावरणात ही कथा पुढे सरकताना दिसतेय.


महत्त्वाचं म्हणजे हा सिनेमा केवळ 16 दिवसांत चित्रीत करण्यात आलाय. हा एक रेकॉ़र्डच म्हणावा लागेल. स्मॉल बजेट असला तरी हा सिनेमा प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतोय.