मुंबई : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या फॅन्सना या दोघांच्या ब्रेक-अपच्या बातमीनं जोरदार झटका दिला... पण, आता मात्र या दोघांचा ब्रेक अप कधी झालाच नव्हता असं समोर येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पिंकविला' नावाच्या वेबसाईटनं केलेल्या दाव्यानुसार, विराट-अनुष्काचा ब्रेक अप झाला नव्हता तर त्यांच्यामध्ये छोट्याशा वादामुळे केवळ काही वेळापुरता दुरावा निर्माण झाला होता...


याचं कारण देताना या वेबसाईटनं म्हटलंय की, विराटनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी बीसीसीआयकडून श्रीलंका टूरसाठी संपर्क साधला होता. श्रीलंका टूरमध्ये आपल्यासोबत अनुष्कालाही घेऊन जाण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी त्याला मनधरणी करावी लागली होती... आणि ही परवानगी त्याला मिळालीदेखील होती पण...


अनुष्का-विराटनं एकत्र काही दिवस घालवण्याचा प्लान आखला होता. पण, अनुष्कानं 'सुल्तान' हा चित्रपट हातात घेतला आणि या प्लानचा बेत फसला... कारण फिल्मच्या शुटींगसाठी तिचा हा श्रीलंका दौरा रद्द होणार होता... आणि त्यामुळेच काही वेळासाठी विराट अनुष्कावर रुसलाय.