मुंबई: अभिनेता श्रेयस तळपदेच्या 'वाह ताज' या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटात श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मंजरी फडणीस मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


या चित्रपटाच्या कथानकात एक मराठी शेतकरी भ्रष्ट व्यवस्थेशी संघर्ष करताना दिसणार आहे. या चित्रपटात हा शेतकरी ताजमहालची जागा ही माझी असल्याचा दावा करतो. या चित्रपटाचा विषय पूर्णपणे वेगळा असल्याचं श्रेयसनं म्हटलंय. 


या चित्रपटाचं दिग्दर्शन अजित सिन्हा यांनी केलं असून 23 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.