मुंबई : केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर अनेक व्यवसायांवर परिणाम झाला. बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनलाही फटका बसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या अभिनयाने नटलेला 'फोर्स 2'ने पहिल्या वीकेंडमध्ये चांगली कमाई केलीये. या सिनेमाने पहिल्या वीकेंडमध्ये 20 कोटी 50 लाखांची कमाई केली.


नोटाबंदीमुळे सिनेमाच्या तिकीटदरात कपात करण्यात आलीये. याचा फायदा 'फोर्स2'च्या कलेक्शनला झाला. पहिल्या दिवशी या सिनेमाने 6.05 कोटी रुपये कमावले. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी अनुक्रमे 6.50 आणि 7.50 कोटी रुपयांची कमाई केली.