मुंबई : मराठी सिनेमा सैराटने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सिनेमा संपतो तरी आर्ची-परशाला सोडायचं मन प्रेक्षकांचं होत नाही, एकीकडे सैराटची विक्रमी घौडदोड सुरू असताना, सैराट सिनेमाचा दुसरा पार्ट म्हणजे 'सैराट टू' कधी येणार अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सैराट टू' येण्याविषयी दिग्दर्शक अथवा निर्माता यांनी अजून कोणतंही भाष्य केलेलं नाही, विशेष म्हणजे या विषय त्यांच्या ध्यानी मनीही नसावा, पण रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरला आणखी एकदा पडद्यावर बघण्याची इच्छा असल्याने प्रेक्षकांकडून 'सैराट टू' कधी येणार यावर चर्चा सुरू आहे.