मुंबई: कौन बनेगा करोडपती या कार्यक्रम अजूनही प्रेक्षकांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. अमिताभ बच्चन यांच्या या कार्यक्रमामध्ये अनेक स्पर्धक हे करोडपती झाले, पण जिंकलेले हे स्पर्धक नंतर कुठे गेले, ते आता करतात तरी काय याविषयी तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. यावरच आपण एक नजर टाकणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


 


 


हर्षवर्धन नवाथे


 



 


'कौन बनेगा करोडपती'चा पहिला करोडपती म्हणजे, हर्षवर्धन नवाथे. या शो चा त्याला कॉल आला तेव्हा तो आयसीएस परीक्षेची तयारी करत होता. पण करोडपती बनल्यानंतर मात्र त्यानं ही परीक्षाच दिली नाही. पण इंग्लंडमध्ये जाऊन त्यानं एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. सध्या तो महिंद्र एँड महिंद्रमध्ये काम करतो. त्याला 2 मुलं आहेत. 


रवी मोहन सैनी



केबीसी ज्युनिअर्समध्ये हा पठ्ठ्या एक करोड रुपये जिंकला, आणि आता तो पोलीस अधिकारी म्हणून देशाची सेवा करत आहे. 


राहत तसलीम



केबीसीच्या चौथ्या सिझनमध्ये राहत तसलीम करोडपती झाल्या. लहान वयामध्ये लग्न झाल्यानं त्यांची अनेक स्वप्न अपूर्ण राहिली होती. पण करो़डपती झाल्यानंतर मात्र त्यांनी आता स्वत:चं कपड्यांचं दुकान काढलं आहे. 


सुशील कुमार



पहिल्यांदाच केबीसीमध्ये 5 करोड रुपये जिंकून सुशील कुमारनं इतिहास बनवला होता. पण त्याच्या नियतीमध्ये मात्र काहीतरी वेगळच लिहीलं होतं. चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे त्यानं जिंकलेल्या सगळ्या पैशांचं नुकसान झालं. आता तो नोकरीच्या शोधात आहे. 


सुनमीत कौर



सहाव्या सिझनमध्ये सुनमीत कौर यांनी 5 करोड रुपये जिंकले, सध्या तरी सुनमीत काय करतायत याबाबत माहिती मिळाली नाही, पण त्यांनी स्वत:चं फॅशन हाऊस सुरु केल्याचं बोललं जात आहे. 


ताज मोहम्मद रंगरेझ



पेशानं इतिहासाचे शिक्षक असलेले ताज मोहम्मद रंगरेझ सातव्या सिझनमध्ये एक कोटी रुपये जिंकले. हे पैसे त्यांनी मुलीच्या डोळ्यांच्या उपचारांसाठी तसंच घर विकत घेण्यासाठी वापरले, आणि उरलेल्या पैशांमधून त्यांनी 2 अनाथ मुलींचं लग्न लाऊन दिलं. 


अचिन नरुला, सार्थक नरुला



या दोन्ही भावांनी केबीसीमधली आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त रक्कम जिंकली. आठव्या सिझनमध्ये हे दोघं 7 करोड रुपये जिंकले. या पैशांमधून त्यांनी आपल्या आईच्या कॅन्सरवर उपचार केले, तसंच स्वत:चा व्यवसायही सुरु केला.