मुंबई : भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांना रॉचा एजेंट ठरवून त्यांना फासावर लटवण्याची शिक्षा पाकिस्तानी लष्कर कोर्टानं दिलीय. पाकिस्तानच्या या कृ्त्यामुळं आज देशात संतापाची लाट आहे. या प्रकरणावर गायक अभिजीतनं बॉलीवूडच्या खान मंडळींवर निशाणा साधला आहे.


कुलभूषण प्रकरणामध्ये सगळे खान गप्प का आहेत असा सवाल अभिजीतनं विचारला आहे. याचबरोबर भारतात कोणीही पाकिस्तानी दिसला तर त्याला झाडावर लटकवलं पाहिजे. हे पाकिस्तानी तुम्हाला बॉलीवूड, भट किंवा जोहरच्या घरात सापडतील असंही अभिजीत म्हणाला आहे.