झहीरबद्दल हे काय म्हणतेय सागरिका, पाहा...
टीम इंडियाचा माजी खेळाडू झहीर खाननं नुकतंच अभिनेत्री सागरिका घाटगे हिच्याशी साखरपुडा केल्याचं जाहीर केलंय. त्यानंतर हे दोघेही आपल्या नात्याबद्दल खुलेपणानं बोलू लागलेत.... आपले फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी खेळाडू झहीर खाननं नुकतंच अभिनेत्री सागरिका घाटगे हिच्याशी साखरपुडा केल्याचं जाहीर केलंय. त्यानंतर हे दोघेही आपल्या नात्याबद्दल खुलेपणानं बोलू लागलेत.... आपले फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.
सागरिकानं शेअर केलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे... सागरिकानं या फोटोसोबत लिहिलंय 'या अनोळखीसोबत घरी परतलेय'.
सागरिकानं सोशल मीडियावर झहीर खानचा एक हॅन्डसम लूकचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोत झहीर क्लीन शेव्ह आणि शॉर्ट हेअरमध्ये दिसतोय.... गेल्या अनेक दिवसांपासून तो दाढी असलेल्या लूकमध्ये दिसत होता.