मुंबई : झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका 'जय मल्हार' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली होती आणि अल्पावधीतच या मालिकेने मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला. जेजुरीतील देव खंडोबा यांच्या आयुष्यावर आधारित या पौराणिक मालिकेने टीआरपीचा उच्चांक गाठला होता. 


जय मल्हारची भूमिका साकारणारे देवदत्त नागे, म्हाळसाच्या भूमिकेतील सुरभी हांडे, बानूच्या भूमिकेतील इशा केसकर यांनी प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. 


इतकंच नव्हे तर जय मल्हार मालिका सुरु झाल्यानंतर जेजुरीला भेट देणाऱ्या भाविकांची संख्याही वाढली होतीय. प्रेक्षकांनी या मालिकेवर भरभरुन प्रेम केले. महेश कोठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली होती.