मुंबई : आज 'सेक्स टॉयज'च्या मागणीत मोठ्याप्रमाणात वाढ होताना दिसत आहे. महिलांची ऑनलाईन खरेदीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 'सेक्स टॉयज'च्या माध्यमातून सेक्स इच्छा पुरी करण्याऱ्या महिलांमध्ये याची मोठी क्रेज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही महिला आपली सेक्सची गरज भागविण्यासाठी चीनमधून 'सेक्य टॉयज' मागवत आहेत. कारण भारतात सेक्ससंबंधीत उत्पादनांवर बंदी आहे. तसेच विक्रीही करण्यात येत नाही. भारतात सेक्स टॉयज बनविणारी कंपनी नाही. असे असताना याची मागणी दिवसागणिक वाढत आहे. सेक्सच्या दिवाणी महिलांना हे उपकरण मिळतही आहे.


एका सर्व्हेत ही बाब पुढे आलेय. भारतात १३ टक्के महिला या सेक्स टॉयजचा वापर करीत आहेत. भारतात हे उपकरण तयार होत नाही. परदेशातून त्याची मागणी करण्यात येत आहे. भारतात सर्वात जास्त सेक्स टॉयज चीनमधून मागविण्यात येत आहे. याची सर्वात जास्त ऑनलाईन खरेदी करण्यात येत आहे.


दरम्यान, सेक्ससंदर्भात उपकरणे विक्री करणारा पकडला गेला तर त्याला दोन वर्षांची शिक्षा आणि दोन हजार रुपय दंड होऊ शकतो. तसेच भारतात सेक्स क्षमता वाढविण्यासाठी आयुर्वेदीक औषधांची दुकानेही आहेत.