उबेर तयार करणार जीपीएस सर्विस
नवी दिल्ली : जगप्रसिद्ध उबेर टॅक्सी कंपनी लवकरच स्व:ताची जीपीएस प्रणाली तयार करत आहे. या महत्वकांक्षी प्रणालीसाठी उबेर 500 अब्ज डॅालर खर्च करणार आहे. या प्रणालीद्वारे संपूर्ण जगाचे मॅपिंग केले जाणार आहे.
उबेरचा हा प्रयत्न ड्रायरव्हरलेस कार बनवण्यासाठी आहे. गूगल मॅपिंग तयार करण्यासाठी मदत करणारे जगातील टॉप डिजिटल मॅपिंग एक्सपर्ट ब्रायर मॅक्लेंडन यांच्या मदतीनेच उबेर कंपनी स्व:ताच्या कंपनीचे स्वतंत्र मॅपिंग बनवणार आहे. त्यामुळे आगामी काळात उबेरला गूगलवर अवलंबून राहावे लागणार नाही. उबेर आता 3.5 अब्ज डॉलरची श्रीमंत कंपनी असून येत्या काळात उबेर कंपनी ड्रायरव्हरलेस गाड्या बनवण्याच्या महत्वकांक्षी प्रकल्पामध्ये लक्ष केंद्रित करत आहे.