पुणे : पुणे पोलीसांनी एक कोटी रुपयांची रोकड पकडली आहे. चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशेच्या नोटांच्या स्वरुपात ही रक्कम आहे. अंकेश अग्रवाल या युवकाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. एक कोटी अकरा लाख शेहचाळीस हजार एवढी ही रक्कम आहे. पुणे पोलीसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पकडण्यात आलेली रोकड ही काळा पैसा असावी असा संशय पोलीसांनी व्यक्त केली आहे. ही रक्कम अग्रवाल याने बदलण्यासाठी आणली होती. अशी माहीती पोलीसांनी दिली आहे. अंकेश अग्रवाल हा इस्टेट एजंट आहे. 


अंकेश अग्रवालला पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकाराची माहिती आयकर विभागाला देण्यात आली, असे पुणे गुन्हे शाखा सहायक पोलिस आयुक्त सुरेश भोसले यांनी सांगितले.