अहमदनगर : अहमदनगरमध्ये तब्बल 1 कोटी रुपये रोकड सापडलीय. यात जुन्या चलनातील १००० आणि ५०० रुपयाच्या नोटा आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदनगर शहरातील नामदेव नगरमध्ये संजय शेलारांकडे ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा असल्याची गुप्त माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी संजय शेलारला अटक केली. 


शेलारांकडे चौकशी केली असता त्याच्याकडे तब्बल १ कोटी रुपयांच्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा सापडल्या. दरम्यान, पोलिसांनी सर्व नोटा जप्त केल्या असुन संजय शेलारला अटक केलीय. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.