वर्धा :  एका कारमधून १ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. सेलूच्या वानरविहिरा हिंगणी परिसरात तहसीलदार रवींद्र होळी आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे.


ही रक्कम नागपूरमधून वॅगनार कारमधून नेण्यात येत होती. या नोटा निवडणुकीसाठी नेण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे. सेलू पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे.