अकरावी प्रवेशाचा प्रश्न गंभीर, विद्यार्थ्यांचा शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षातच ठिय्या
जिल्ह्यातल्या वणी इथल्या १५० विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचा प्रश्न गंभीर बनला आहे. विनाअनुदानित महाविद्यालयांनी प्रवेशासाठी भरमसाठ डोनेशनची मागणी केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
यवतमाळ : जिल्ह्यातल्या वणी इथल्या १५० विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचा प्रश्न गंभीर बनला आहे. विनाअनुदानित महाविद्यालयांनी प्रवेशासाठी भरमसाठ डोनेशनची मागणी केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
प्रवेशासाठी वारंवार यवतमाळच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवणा-या विद्यार्थ्यांनी, आता हक्काच्या शिक्षणासाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षातच ठिय्या मांडला आहे. तातडीन या प्रश्नावर तोडगा काढू असं आश्वासन शिक्षणाधिका-यांनी विद्यार्थी आणि पालकांना दिलं.