मुंबई- गोवा महामार्गावरील 21 पैकी 15 पूल ब्रिटीशकालीन
रायगडमधल्या सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे महाड-पोलादपूर दरम्यानचा एक ब्रिटीशकालीन पूल काल रात्री साडेअकराच्या सुमारास वाहून गेला. या दुर्घटनेत पुलावरुन जाणाऱ्या २ एसटी बसेससह ७ ते ८ वाहनंही वाहून गेली.त्यामुळे या दुर्घटनेत २० ते २५ जण बेपत्ता झाल्याची भीती वर्तवली जात आहे.
महाड : रायगडमधल्या सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे महाड-पोलादपूर दरम्यानचा एक ब्रिटीशकालीन पूल काल रात्री साडेअकराच्या सुमारास वाहून गेला. या दुर्घटनेत पुलावरुन जाणाऱ्या २ एसटी बसेससह ७ ते ८ वाहनंही वाहून गेली.त्यामुळे या दुर्घटनेत २० ते २५ जण बेपत्ता झाल्याची भीती वर्तवली जात आहे.
वाहनांमध्ये राजापूर-बोरीवली आणि जयगड-मुंबई या दोन एसटी बसेसचा समावेश आहे. ब्रिटीशांनी बांधलेला हा पूल सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा जुना होता. हा पूल वापरण्यास असुरक्षीत आहे, असं पत्र दोन वर्षांपूर्वीच ब्रिटीशांनी पाठवल्याचा दावा काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी केला आहे.
दुसरीकडे मुंबई- गोवा महामार्गावरील सर्व पुलांचं ऑडिट करण्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या महामार्गावर एकूण 21 पूल आहेत,त्यापैकी 15 पूल हे ब्रिटिशकालीन आहेत.
मुंबई- गोवा महामार्गावरील पूल
1.जगबुडी पूल- 1943 ब्रिटिश कालीन
2.वाशिष्टी पूल- 1943 ब्रिटिश कालीन
3.आरवली पूल- 1932 ब्रिटिश कालीन
4.शास्त्री पूल- 1939 ब्रिटिश कालीन
5.सोनवी पूल- 1939 ब्रिटिश कालीन
6.सप्तलिंगी पूल- 1979 स्वातंत्र्यानंतर
7.बाव पूल- 1925 ब्रिटिश कालीन
8.अंजनारी पूल- 1931 ब्रिटिश कालीन
9.वाकेड पूल- 1931 ब्रिटिश कालीन
10.राजापूर पूल- 1944 ब्रिटिश कालीन
11.खारेपाटण पूल- 1946 ब्रिटिश कालीन
12.पिआली पूल- 1941 ब्रिटिश कालीन
13.बेळणा पूल- 1961 स्वातंत्र्यानंतर
14.जानवली पूल- 1934 ब्रिटिश कालीन
15.गड पूल- 1934 ब्रिटिश कालीन
16.कसाल पूल- 1934 ब्रिटिश कालीन
17.पिठढवळ पूल- 1957 स्वातंत्र्यानंतर
18.बांबर्डे पूल- 1938 ब्रिटिश कालीन
19.भंगसाळ पूल- 1968 स्वातंत्र्यानंतर
20.बांदा पूल- 1958 स्वातंत्र्यानंतर