पालघर : विक्रमगड तालुक्यातील कासा बुद्रूक जिल्हा परिषद शाळेतील  जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांना मध्यान भोजनातून  विषबाधा झाली आहे. यापैकी १७  विद्यार्थ्यांची परिस्थिती गंभीर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दूपारी इस्कॉन या संस्थेमार्फत पुरवण्यात येणारी खिचडी खाल्याने विद्यार्थ्यांना मळमळ, चक्कर, उल्ट्या होऊ लागल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले, त्यानंतर त्यांना  जवळच्या तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि उपजिल्ह्या रुग्णालय कासा येथे दाखल करण्यात आलं.


विद्यार्थी आणि पालकांमध्ये यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.