नाशिकमध्ये अफवा रोखण्यासाठी २ दिवस इंटरनेट सेवा बंद
अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी सोशल मीडियावरच्या अफवा कमी करण्यासाठी दोन दिवसांसाठी नाशिक शहरातील नेटसेवा बंद करण्यात आली आहे. तणाव काही प्रमाणात निवळला असून आज गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. काही ठिकाणी शांततेत निषेध व्यक्त केला जात आहे.
नाशिक : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी सोशल मीडियावरच्या अफवा कमी करण्यासाठी दोन दिवसांसाठी नाशिक शहरातील नेटसेवा बंद करण्यात आली आहे. तणाव काही प्रमाणात निवळला असून आज गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. काही ठिकाणी शांततेत निषेध व्यक्त केला जात आहे.
सर्वत्र एसआरपीएफ तैनात करण्यात आले आहेत. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मुंबई नाशिक हायवेवरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. मात्र खबरदारी म्हणून जिल्ह्यातली आणि जिल्ह्याबाहेरची एसटी सेवा पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे. अतिरिक्त महासंचालक मध्यरात्रीपासून नाशिकमध्ये उपस्थित असल्याने आता कठोर भूमिका घेण्यात आली आहे.
पाहा व्हिडिओ