पिंपरी-चिंचवडमध्ये २२ गाड्यांची तोडफोड, मनसे पदाधिकाऱ्याची गाडीला लक्ष
पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये गाड्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे. वाकडच्या थेरगावात २२ गाड्यांची तोडफोड करण्यात आलेय. दोन गटांतल्या वादातून ही तोडफोड झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पिंपरी : पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये गाड्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे. वाकडच्या थेरगावात २२ गाड्यांची तोडफोड करण्यात आलेय. दोन गटांतल्या वादातून ही तोडफोड झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा गाड्या फोडण्याची घटना घडलीय. थेरगाव परिसरात तब्बल २२ गाड्यांची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. त्यात चार चाकी गाड्यांचा ही समावेश आहे.
विशेष म्हणजे मनसे शाखा प्रमुख माऊली बोऱ्हाडे यांच्या ही गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. दिवसापूर्वी थेरगाव मध्ये दोन गटात वाद झाला होता. त्या वादातूनच ही तोडफोड झाली असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, शहरात काही दिवसांपूर्वी आकुर्डी परिसरात ही गाड्यांची तोडफोड झाली होती. शहरात सातत्यान होत असलेल्या या तोडफोडीच्या घटनेन शहरवासियांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दुसरीकड पोलिसांचे मात्र गाव गुंडांवर कसलाही धाक नाही असंच स्पष्ट होतंय, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.