गोंदिया :  विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील  बाई गंगाबाई स्त्री शासकीय रुग्णालयात १५ दिवसांत १८  नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या दीड महिन्यात ४३  नवजात बालकं दगावली आहेत. या प्रकरणी डॉक्टर आणि रुग्णांमध्येच आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. या भागात ग्रामीण भागातून महिला येतात, त्यांना पुरेसा सकस आहार मिळत नसतो, त्यामुळे नवजात बाळं दगावल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.


तर या रुग्णालयात प्रसूतीवेळी डॉक्टरच उपलब्ध नसल्य़ानं आणि वेळीच उपचार मिळत नसल्यानं बाळं दगावतात, असा रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा आरोप आहे.  तसंच या रुग्णालयात अनेक रिक्तं पदं आहेत, ती भरली जात नसल्यानं रुग्णालयातल्या व्यवस्थेवर ताण येत असल्याचा आरोपही होत आहे.