अपघातात एकाच कुटूंबातील पाच जण ठार
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथे झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील पाच जण ठार झालेत. विशाळगड येथे दर्शनासाठी जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने आय ट्वेंटी कारमधून प्रवास करणारे ४ जण जागीच ठार झाले. तर एका ८ वर्षीय मुलीचा उपचारासाठी कोल्हापूरला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. मृत पावलेले सर्वजण पुण्याच्या हडपसर भागातील रहिवासी आहेत. तर दूसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कुवे मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर 8 जण गंभीररित्या जखमी झालेत.
मलकापूर : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथे झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील पाच जण ठार झालेत. विशाळगड येथे दर्शनासाठी जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने आय ट्वेंटी कारमधून प्रवास करणारे ४ जण जागीच ठार झाले. तर एका ८ वर्षीय मुलीचा उपचारासाठी कोल्हापूरला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. मृत पावलेले सर्वजण पुण्याच्या हडपसर भागातील रहिवासी आहेत. तर दूसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कुवे मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर 8 जण गंभीररित्या जखमी झालेत.
सुमोवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेल्या असलेल्या झाडावर जोरदार आपटली. या अपघातात चालक मंगेश डोंगरे आणि त्याच्या बाजुला बसलेल्या रविंद्र भाताडे यांचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरित सुमोतील 8 जण गंभीररित्या जखमी झाले.