जळगाव : जिल्ह्यात एकाच दिवशी ५८६ मिलीमीटर पाऊस झाला. जळगावसह धरणगाव, चोपडा, अमळनेर तालुक्यात अतिवृष्टी झाली. चंपावती नदीला आलेल्या पुरात १२५ घरे, २८ झोपड्या ८० दुकाने तसेच १८ जनावरे वाहून गेली, प्रशासनाने पंचनामे सुरू केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातपुड्यात सहा तासात 124 मिलीमीटर पाऊस झाला.त्यामुळे चहार्डी, लासूर, चुंचाळे, दोंदवाडे गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. चहार्डी गावाला चंपावती नदीच्या पुराचा वेढा बसल्यानं गावातल्या नदीकाठची १२५ घरं, २८ झोपड्या, ८० दुकानं, १८ जनावरं वाहून गेली. त्यामुळे ग्रामस्थांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. 


चोपडा तालुक्यातल्या गावांमध्ये २००६ साली अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. पुरामुळे हाहाकार माजला होता. पंचनाम्यासाठी प्रशासन आलं, मात्र शासनानं तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त गावकऱ्यांनी केलीय.  गावातल्या १० सरकारी कार्यालयांमध्ये या पुराचं पाणी शिरलं असून त्यातील जुने रेकॉर्ड खराब झालेत.