मुंबई : देशभरात ठिकठकाणी कोटींची रक्कम जप्त करण्याच आली. पिंपरी चिंचवडमध्ये वाकडं पोलिसांनी ६७ लाखांची रोकड जप्त केली. त्यामध्ये दोन हजार रुपयांच्या ६२ लाखांच्या नव्या नोटा आहेत. या प्रकरणी वाकड पोलिसांनी आठवले गटाच्या रिपब्लिकन पक्षाच्या रोजगार आगाडीचं उपाध्यक्ष अमित सुरेश दोषींसह चार जणांना ताब्यात घेतलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक मोटार संशयास्पदरित्या थेरगाव इथं एका सोसायटी जवळ थांबल्याची पोलिसांना दिसली. पोलिसांनी मोटारीची झडती घेतली असता मोटारीच्या डिकीत 67 लाख रुपयांची रोकड मिळून आली. 


पोलिसांनी पैशांबाबत विचारणा केली असता त्यांना उडवाउवीची उत्तरं दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. मात्र, याबाबतत पोलिसांनी पत्रकारांना कसलीही माहिती दिलेली नाही. त्यामुळं या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा आहे.


ठाणे
ठाणे पोलिसांनी 1 कोटी 40 हजारांची रोकड जप्त झालीय. जप्त केलेल्या सर्व नव्या चलनातल्या आहेत. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आलीय. तिघेही आरोपी ठाण्यातले व्यावसायिक आहेत. ठाणे सीव्हील हॉस्पिटलमधून या तिघांना अटक करण्यात आलीय. हे तिघे नोटा बदली करण्यासाठी येणार असल्याची ठाणे पोलिसांना माहिती मिळाली होती. या प्रकरणात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता आहे. ठाणे पोलीस त्या दृष्टीने तपास कर आहेत.


दिल्ली
दिल्लीत करोल बागमधून पाचजणांकडून सव्वा तीन कोटींची रोकड जप्त केली गेली.