अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर  : पिता-पुत्रीच्या नात्याला काळिमा फासत, दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलींचा त्यांच्या बापानेच लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. आरोपी नराधम बाप नागपुरातील एका राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित संशोधन संस्थेचा सेवानिवृत्त शास्त्रज्ञ असून त्याचे सध्या वय ७२ वर्षे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या कालावधीत दत्तक घेतलेल्या तीन मुलींचे हा नराधम बाप लैंगिक शोषण करत असल्याचे गंभीर आरोप पीडित मुलींनी लावले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याने नियमबाह्य पद्धतीने मुली दत्तक घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. 


नागपूरच्या धंतोली पोलीस स्थानकातीळ कर्मचारी तेव्हा हादरून गेले जेव्हा १६, ११ आणि ६ वर्षांच्या तीन अल्पवयीन मुलींनी आपल्या पित्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावले. आपला सावत्र बाप (दत्तक घेणारा) आपल्याशी लैंगिक गैरवर्तनाचे करत असल्याचे गंभीर आरोप त्यांनी केले. 


१६ वर्षीय मुलीचा आरोप आहे की तिचे ७२ वर्षीय वडील डॉ मकसूद हसन अन्सारी नागपूरच्या अजनी परिसरातील राहत्या घरी तिचे लैंगिक शोषण करीत असे. गेल्या ८ वर्षांपासून त्याचे हे दुष्कृत्य सुरु असल्याचे पीडित मुलीचे आरोप आहेत. 


एवढेच नाही तर या नराधम बापाने ११ आणि ६ वर्षीय मुलींसोबत ही छेडखानी करण्याचे अनेक वेळा प्रयत्न केल्याचे पीडित मुलींनी पोलिसांना सांगितले आहे. घरात सुरु असलेला प्रकार बाहेर कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीच बापाने दिल्यामुळे तिन्ही मुली गप्प राहायच्या. मात्र, गेल्या काही महिन्यात बापाचे त्रास वाढला. 


 मोठ्या मुलीची प्रकृती खालावू लागल्याने तिने शाळेतील मैत्रिणीकडे संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. मैत्रिणीने तिच्या आईला सर्व प्रकार सांगितले आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. दरम्यान, घटना उघडकीस आली तेव्हा यातील आणखी एक महत्वाचा दुवा उघड झाला. 
 
 या प्रकरणातील आरोपी अन्सारीने ऐकणं ३ लग्न केले आहे. त्याचे तिसरे लग्न झाले तेव्हा त्याच्या आणि पत्नीच्या वयात २० वर्षापेक्षा जास्त अंतर होते आणि अन्सारी तिला देखील मारहाण करीत असे. 


 पोलीस तपासात अजूनपर्यंत तिन्ही मुली नियमाप्रमाणे दत्तक घेतल्याचे कोणतेच कागदपत्रे पोलिसांना साडपले नाही. त्यामुळे तिन्ही मुली नियमबाह्य पद्धतीने दत्तक घेतल्याचा संशय आहे. नियमाप्रमाणे ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तीला मूल दत्तक घेता येत नाही. त्यामुळे डॉ अन्सारी यांचे वय ७२ असताना त्यांनी ६ आणि ११ वर्षाच्या असलेल्या मुली काही वर्षांपूर्वी दत्तक कश्या घेतल्या याचा तपास होण्याची गरज आहे.