शिर्डी : श्रीरामपूर नगरपरिषदेत धक्कादायक राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेसचे आठ नगरसेवकांनी महाआघाडीशी हात मिळवणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांना धक्का हा जोरदार धक्का मानला जात आहे. काँग्रेसचे आठ नगरसेवक फुटले असून त्यांनी श्रीरामपूर नगरपरिषदेतील महाआघाडीला पाठिंबा दिला.  जयंत ससाणे यांच्या पत्नीचा झालेला पराभव आणि आता नगराध्यक्ष पद गेल्यानंतर हा दुसरा धक्का मानला  जात आहे.


काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या ८ नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला आहे. या नव्या गटाने महाआघाडीला समर्थन दिला आहे. काँग्रेसचे २२ नगरसेवक निवडणू आले होते. दरम्यान, महाआघाडीकडे नगराध्यक्षासह १० नगरसेवक आहे. त्यामुळे आता महाआघाडीकडे सत्तेच्या चाव्या अधिक मजबूत झाल्यात.