अॅम्बी व्हॅली ऑफिसला ठोकलेलं सील काढले
पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यातल्या अॅम्बी व्हॅलीच्या ऑफिसला ठोकलेलं सील काढण्यात आले आहे.
लोणावळा : पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यातल्या अॅम्बी व्हॅलीच्या ऑफिसला ठोकलेलं सील काढण्यात आले आहे. थकीत रकमेचे धनादेश सहारानं दिल्यानंतर ही कारवाई तूर्तास मागे घेण्यात आलंय.
३ कोटी २ लाख रुपये इतका महसूल थकीत होता. या रक्कमचे धनादेश दिल्यानंतर ही कारवाई मागे घेण्यात आल्याची माहिती मुळशी तहसीलचे मंडळ अधिकारी मंगेश शिंगटे यांनी ही माहती दिलीय.
सहारानं बिनशेत जमिनीचा महसूल थकवल्यानं महसूल विभागानं काल सकाळपासूनच कारवाईला सुरुवात केली होती. अॅम्बी व्हॅलीच्या प्रवेशद्वारालाही सील ठोकण्यात आलं होतं. या कारवाईनंतर दुपारी अॅम्बी व्हॅली व्यवस्थापनाकडून वेगाने हालचाली करण्यात आल्या आणि एक कोटी रुपये कराची रक्कम सरकारी तिजोरीत भरण्यात आली. त्यानंतर ही कारवाई स्थगित करण्यात आली आहे.