सांगली : जिल्ह्यातल्या म्हैसाळ येथील गर्भपात प्रकरणी फरार डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे हा डॉक्टर होता की कसाई असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. म्हैसाळच्या या कसायाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पाच पथकं तयार करण्यात आली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी म्हैसाळमध्ये जमीन पुरलेल्या 19 पिशव्या सापडल्या. पिशव्यामध्ये मृत भ्रूणाचे अवशेष आणि हाडं होती. दरम्यान आणखीन गर्भपात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. खिद्रापुरेच्या दवाखान्यावर छापा घालण्यात आला. तिथे तळघरात गर्भपाताचा अड्डा बनवल्याचं पुढे आलं आहे.


पाहा व्हिडिओ