ठाणे : ठाण्यातील काही शिवसैनिकांनी मनसेचा रस्ता धरलाय. दिव्यातील मनसेचे नगरसेवक शैलेश पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळं नाराज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट कृष्णकुंज गाठून मनसेत प्रवेश केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक वर्ष सेनेत राहून इमाने इतबारे सेवा करूनही ऐन निवडणूकीच्यावेळी मनसेच्या नगरसेवकाला सेनेत प्रवेश दिल्यानं दिव्यात कमालीची नाराजी आहे. तर शिवसेनाच नाही तर इतर पक्षातील कार्यकर्त्यांनीही मनसेत प्रवेश केल्याची माहिती मनसे पदाधिका-यांनी दिली. 


आज ठाण्यातील शिवसेनेच्या हजारो कार्यकरय्यानी कृष्णकुंजवर मनसेत प्रवेश केलाय. मनसेमधील नगरसेवक शैलेश पाटील यांना सेनेत प्रवेश दिल्यामुळे सेनेतील सामान्य कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असून याचमुळे त्यांनी आज मनसेत प्रवेश केला. 


दिनेश मांडवकर, सचिन अधिकारी, विनायक रणपिसे आणि सुधीर म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारर्यकर्ते मनसेमध्ये प्रवेश केला. तर मनसेकडून केवळ शिवसेनाच नाही तर इतर पक्षातील कार्यकरय्यानीही मनसेत प्रवेश केल्याची माहिती दिली. 


दरम्यान, मुंबई आणि नाशिक मधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे नगरसेवकांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 'मातोश्री' वर हा कार्यक्रम पार पडला. 


मुंबईतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका रिद्धी फुरसुंगे, नाशिक मधील राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि कट्टर भुजबळ समर्थक शिवाजी चुंबळे, कल्पना चुंबळे तसेच मनसे नगरसेवक अशोक सातभाई यांनी आपापल्या पक्षांना सोडचिठ्ठी दिली.