बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी रास्तारोको आंदोलन
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी, यासाठी तामिळनाडू प्रमाणे महाराष्ट्रातील जनता आता रस्त्यावर उतरू लागली आहे.
पुणे : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी, यासाठी तामिळनाडू प्रमाणे महाराष्ट्रातील जनता आता रस्त्यावर उतरू लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज मंचर येथे पुणे- नाशिक महामार्गावर आज शेतकऱ्यांनी आणि बैलगाडा संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केले.
विशेष म्हणजे या आंदोलना मध्ये छोटा पुढारी घनशाम दरोडे,दिलीप वळसे पाटील, शिवाजी आढळराव पाटील यांच्या सह सर्वच राजकीय नेते सहभागी झाले होते. त्यामुळे या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती.