पिंपरी चिंचवड : महापालिका निवडणुकांमध्ये विशेषत: पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर अजितदादा नॉट रिचेबल आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रकारांना प्रतिक्रिया देणं सोडाच, पण स्थानिक नेते, कार्यकर्ते यांनाही ते नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रम आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचं पानिपत झाल्यावर आता कार्यकर्ते अक्षरशः सैरभैर झालेत. याआधीही अजितदादा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नॉट रिचेबल झाले होते.