पिंपरी-चिंचवड : चार भिंतींच्या आत राहुनही न्याय मिळत नसेल तर मग त्यांचा एकनाथ खडसे होतो, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लगावला आहे. प्रत्येक पक्षात अंतर्गत कलह असतो, काही जण पक्षशिस्तीमध्ये राहून चार भिंतीत राहून भूमिका मांडतात. ही भूमिका मांडल्यानंतरही ज्यांना न्याय मिळत नाही त्यांचा एकनाथ खडसे होतो, असं अजित पवार म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षाला बहुजन चेहरा देण्याचं काम आम्ही केलं, पण सरकार आल्यावर आम्हाला बाजूला करण्यात आलं, असं खडसे म्हणाले होते. पक्ष चालवणाऱ्यांनी याकडे गंभीरपणे पाहावं अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. हे बोलतानाच भाजपचा तो अंतर्गत विषय असल्याचंही अजित पवार म्हणाले. 


पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षकांच्या गौरवासाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी अजित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.